स्त्री आणि पुरुष समाजातले दोन महत्त्वाचे घटक किंबहुना ज्यांच्यामुळे समाज तयार होतो असे दोन घट..समाज बनविण्यात, तो घडविण्यात दोघांचाही समान वाटा आणि समान योगदान . पण ही समानता त्या दोघांच्या बाबतीत अजूनही पूर्णपणे दिसत नाही. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात आजही स्त्री ही पुरुषानंतर अशीच समजूत आपल्याकडे आहे. आज एकविसाव्या शतकात शिक्षणआणि विज्ञानामुळे ब-याच गोष्टी बदललेल्या असल्या तरी स्त्रीकडे बघण्याची परंपरेतून चालत आलेली मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाहीये. आजही तिच्यासाठी चारचौघात वागण्याचे आणि समाजात जगण्याचे वेगळे नियम आहेत. मुलगा म्हटलं की धाडसी-साहसी…. मुलगी म्हटलं की ती नाजूक, हळवी!!! कुणी तयार केलेत हे नियम ?त्याचं मूळ कशात आहे? लहानपणापासूनच जाणते-अजाणतेपणी या गोष्टी आपल्या मनावर कशाप्रकारे बिंबवल्या जातात आणि त्याचे परिणाम काय होतात ? याचा आढावा आजच्या या लेखातूनघेतायत ‘होणार सून मी ह्या घरची’ सारख्या लोकप्रिय मालिकेच्या आणि ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चिव चि सौ कां’सारख्या प्रसिद्ध चित्रपटाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी.
Read more