career

संधी मिळत नाही तर ती मिळवावी लागते !

मर्यादांचे रिंगण सोडून स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात पदार्पण केले आहे. पण काही वेळा स्वभावामुळे तर काही आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे कुठेतरी पिछेहाट होऊ नये याची काळजी प्रत्येकीने घेतली पाहिजे. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या वेळोवेळी अमलात आणल्या पाहिजेत.

स्वतःच्या कलागुणांची दखल घेण्याजोगी परिस्थिती निर्माण करणे : स्वतःच्या कलागुणांची दखल घेण्याजोगी परिस्थिती निर्माण करा म्हणजे थोडक्यात स्वतःला प्रमोट करायला शिकले पाहिजे. काही वेळा आपल्याकडूनच स्वतःला प्रमोट करण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला जात नाही त्यामुळे आपण आपोआपच मागे पडतो.

आखून दिलेल्या कामामध्ये अडकून पडण्यापेक्षा त्यापेक्षा आपली बढती कशी होईल याचा विचार करून आणि त्यानुसार आपली योजना आखून ठेवली पाहिजे.

बोलण्याची पद्धत हि सुद्धा काहीवेळा यशामध्ये अडथळा व्हायला कारणीभूत ठरू शकते. निसर्गतःच स्त्रियांना शांतपणे बोलण्याची सवय असते.शांतपणे बोलण्याची हीच पद्धत दुबळेपणा होता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी जे बोलाल ते खंबीरपणे बोला.

एकदा नोकरी मिळाली कि, तीच नोकरी सुरक्षित कशी राहील याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. पण अशातून आपण पर्यायांचा शोध घेत नाही. एक तर जास्त पगाराची नोकरी मिळण्याची संधी मिळवण्याच्या पर्यायाचा शोध घेतला पाहिजे आणि त्यासाठी परिस्थितीनुरूप येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याची मानसिकता असायला हवी.

प्रोफेशनल आयुष्य जगताना आपण कामात इतक झोकून देतो कि त्या व्यतिरिक्त आपल्या विकासाच्या दृष्टीने विचार करायच्या साध्य आणि सोप्या गोष्टी राहून जातात त्याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे.

Comments
More Articles
Designed and Developed by SocioSquare

Please wait...