kutumbaachi-karti

संस्कृतीतील नवा पायंडा : कुटुंबाची कर्ती आता ‘ती ‘ !

प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वतःला सिध्द करून तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं पार पाडताना ती कुठेही मागे पडलेली नाही. चूल आणि मुल या समाजाने बांधून दिलेल्या संकल्पनेला तीने एक वेगळं रूप दिलेलं आहे म्हणजेच चूल आणि मुल सांभाळून सुद्धा आपापल्या क्षेत्रात भक्कमपणे उभं राहण्याच सामर्थ्य स्त्रिया दाखवत आहेत. याच सामर्थ्याची दखल घेत दिल्लीच्या उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कुटुंबातील थोरला पुरुष ज्याप्रकारे कुटुंबाचा कर्ता म्हणून जबाबदारी पार पाडू शकतो त्याचप्रकारे स्त्री देखील कुटुंबाच्या पालनपोषणासाठी सक्षम आहे असे घोषित केले.

प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्कं आणि अधिकार मिळावेत, त्यांना पुढारण्यासाठी संधी निर्माण व्हावी यासाठी कायदे नेहमीच कटिबद्ध असतात त्यातलच एक पाऊल म्हणजे स्त्रीला कर्तेपणाचा अधिकार बहाल करणे होय . 2005 च्या हिंदू वारसा कायद्यानुसार स्त्रीला वडिलोपार्जित मालमत्तेत हक्कं मिळत असेल तर कुटुंबातील थोरलेपणाच्या निकषावर कर्तेपणाचा अधिकार देखील तीला मिळणे अपेक्षित आहे असे मत नज्मि वजीरा यांनी नोंदवले. पुरुषसत्ताक संस्कृतीची चौकट मोडणारा हा हक्क खऱ्या अर्थाने स्त्री सामर्थ्याचा सन्मानच आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquare