cultureandtradition

मकरसंक्रांतीच्या माहितीचा खरा गोडवा

समैत्रिणींनो ! वर्षाची खऱ्या अर्थाने गोड सुरुवात होते ती मकरसंक्रांतीने ! ‘तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असं बोलून नात्यांमधला गोडवा कायम ठेवण्याचा हा भावनिक संदेश असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सण आपण अगदी हौशीने आणि आनंदाने साजरा करतो पण त्या सणामागे काही नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे देखील आहेत याची माहिती आपल्याला असायला हवी.

हिंदूंचे प्रत्येक संण हे चंद्राच्या कलेवर अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येक सणाच्या तारखा या वेगवेगळ्या असतात; पण मकरसंक्रात हा एकमेव सण असा आहे कि जो सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे २०५० पर्यंत मकरसंक्रात हि जानेवारीच्या दर १४ तारखेला किंवा क्वचित १५ तारखेलाच येते. २०५० नंतर हि तारीख १५ जानेवारी आणि १६ जानेवारी अशी होईल.

सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो, त्या दिवशी त्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.त्यामुळे या दिवासाला ‘मकरसंक्राती’ म्हणतात तसेच हा एकच असा सण आहे कि प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. या सणाला तिळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की असे पदार्थ वाटले जातात. यामागचे प्रयोजन असे कि जानेवारी महिना हा हिवाळ्याचा महिना आहे त्यामुळे या दिवासात गरम पदार्थ शरीराला पोषक असतात. तसच सूर्यकिरणे ही शरीर आणि त्वचेसाठी उपयुक्त असतात त्यामुळे पहाटे पतंग उडवण्याची देखील पद्धत आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या दिवसात ऋतू परिवर्तन होत असते त्यामुळे गहू, ऊस आणि इतर पिकांची कापणी सुरु होते त्यामुळे निसर्गाचे आभार या सणाच्या माध्यमातून मानले जातात.

तर अशा काही गोष्टी मकरसंक्रात सणामागे आहेत. सण साजरे करण्यामागची पार्श्वभूमी माहित असेल तर ते सण साजरे करण्याला खऱ्या अर्थाने साफ़ल्यता येते.

Comments
More Articles
Designed and Developed by SocioSquare

Please wait...