finance

गुंतवणुकीने करा भविष्य सुरक्षित

‘सगळी सोंगे करता येतात ; पण पैशाचं सोंग करता येत नाही’ असं म्हटलं जातं. थोडक्या शब्दात यातून वास्तव मांडल आहे. धावपळीमध्ये आपलं जीवन अडकलं आहे त्यातून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता स्त्रियांनाच जास्त असते. मग त्यातून थोडे पैसे बाजूला काढून बचत सुरूच असते. पण त्याचे रूप आता मोठ्या प्रमाणावर असायला हवे आणि आता तीच काळाची गरज आहे. त्यासाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा.

कालच्यापेक्षा उद्याची परिस्थिती चांगली असावी हा सामान्य विचार तर प्रत्येकाचाच असतो. त्या अनुषंगाने आपल्यापेक्षा आपणच श्रीमंत होण्यासाठी आजच गुंतवणूक करणे हे महत्वाचे आहे.

आज-काल आपल्या मुलांची स्वप्न संकुचित नसतात. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील स्वप्नांसाठी गुंतवणूक असणे आवश्यक आहे.

रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात आता केलेली गुंतवणूकच भविष्यातील पुंजी आहे याची जाणीव असू द्या.

अचानक येणारी आजारपण आणि त्यातून छोटा मोठा खर्च होत असतो. अशावेळी गुंतवणूक मोठा आधारस्तंभ ठरते. त्यामुळे गुंतवूकीमध्ये सक्रिय रहा.

अनेक अधिकृत बँकांच्या गुंतवणुकीसंबंधी म्युच्युअल फंड्स, फिक्स डीपोझीट तसेच लाइफ़ इन्शुरन्स , शेअर्स अशा विविध योजना असतात त्याची सविस्तर माहिती घेऊन आपल्यासाठी योग्य योजना कोणती याचा विचार करून आताच गुंतवणूक करायला हवी.

Comments
More Articles
Designed and Developed by SocioSquare

Please wait...