safety

ऑनलाइन शॉपिंग करताना हे लक्षात ठेवा

स्वतःच्या डोळ्यांनी निरखून मगच वस्तू खरेदी करायची सवय आपल्यापैकी अनेकांना असते;पण आता काळाच्या वेगाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीचा देखील स्वीकार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पण ऑनलाइन खरेदी करायची असेल तर काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

वस्तूची किंमत पडताळणे :
एखादी वस्तू खरेदी करण्याआधी त्याची किंमत इतरही वेबसाईट्स वरून अॅप वरून पडताळून पहा. त्यातल्या सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करा.

विश्वासार्हता तपासणे :
ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करत आहोत त्या कंपनी संबंधी आणि वस्तूबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इतरांचे अनुभव , कंपनीच्या वेबसाइटवरून खातरजमा करावी.

वस्तूचे पेमेंट :
वस्तूचे पैसे देण्यासाठी विविध पर्याय असतात. वस्तू घरपोच आल्यावर रोख रक्कम देणे, डेबिट अथवा क्रेडिट कार्ड मार्फत रक्कम देणे इत्यादी याला पेमेंट गेटवे म्हणतात. या विविध पर्यायांमध्ये रोख रक्कम देणे हाच पर्याय अतिशय सुरक्षित आहे.

ऑनलाइन ऑर्डरची प्रत जपून ठेवणे :
ऑनलाइन जे काही ऑर्डर कराल त्याची प्रत जपून ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या ऑर्डर संदर्भात काहीही अडचण असेल तर त्यावर पुष्टी करण्यासाठी नंबर असतो त्याचा उपयोग होऊ शकतो.

अशाप्रकारे ऑनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे आणि मुलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Comments
More Articles
Designed and Developed by SocioSquare

Please wait...