parshwabhumi

जाणून घ्या महिला दिनाची पार्श्वभूमी

८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात ‘महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. पण त्या मागची पार्श्वभूमी देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. समाजाने महिलांना कायमच दुय्यम स्थान दिलेले होते. त्यांच्या प्रगतीला आणि सक्रीयतेला खीळ बसेल अशा गोष्टी स्त्रियांवर पूर्वापार लादल्या गेल्या.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून निदर्शने केली . आपल्या हक्क आणि मागण्यांसाठी त्या पुढे आल्या. १० तासांचे काम आणि कामाच्या जागी सुरक्षितता या त्यांच्या मागण्या होत्या त्याचबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही त्यांनी केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दिवसाच्या धर्तीवर स्त्री संघटनांना बळकटी आली आणि आपल्या मागण्या आणि हक्कांसाठी त्या सक्रिय झाल्या.

More Articles
Designed and Developed by SocioSquares