dulhan banner

फॅशनेबल लग्नसराई!!

गणपती, नवरात्र, दिवाळी अशा भारदस्त सणांमुळे दुकानांत गि-हाईकांचा ओघ सुरु होताच, आणि आता पुन्हा शॉपिंगची रेलचेल दिसू लागलीये ती लग्न सोहळ्यांच्या सीझनमुळे!! लग्न घरातील मंडळींची तयारी वर्षभरापूर्वीचं सुरु झालेली असते. हॉलचं बुकींग, डेकोरेशन, रुखवताच्या सजावटीपासून सा-याच गोष्टींचे व्यवस्थापन साग्रसंगीत करावे लागते, मात्र याही व्यतिरिक्त महत्त्वाची असते खास लग्न सोहळ्यासाठीची फॅशन, कारण नवरा नवरी केंद्रस्थानी असले तरी लग्नातील इतर सर्व मंडळींचा पेहराव देखील असावा लागतो आकर्षक! जर, तुम्हाला येत्या महिन्यांमध्ये अशा सोहळ्यांना हजेरी लावयची असेल, तर मेकअप व शॉपिंगचं योग्य संतुलन साधून तुम्ही नक्कीच मिळवू शकता एक ट्रेंडी लूक!!
१. ट्रेडीशनल पेहरावाला पसंती देणार असाल, तर लहान व आकर्षक काठ-पदर असणारी साडी आणि त्यासोबत डिझायनर ब्लाऊजचे कॉम्बिनेशन निवडल्यास यामध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
२. साध्या ब्लाऊजपेक्षा बॅकलेस, की होल बॅक, हायनेक, एम्ब्रोडरी ब्लाऊज यांमुळे वेगळा गेटअप येईल.
३. साड्यांची महाराणी असणा-या पैठणीला मॉर्डन बनवायचे असेल तर हॉल्टरनेक, थ्रीफोर्थ किंवा सिव्हलेस ब्लाऊज तुम्ही निवडू शकता, तसेच रिसेप्शनसाठी पैठणीचा वनपीस, वेस्टर्न स्टाईल ड्रेस किंवा स्कर्ट हे देखील फॅशन जगतात सध्या ट्रेंडी आहेत.
४. पैठणीवरील डिझाईनचा वापर करुन ड्रेस किंवा घेरदार अनारकली शिवू शकता, जे तुम्हाला पारंपारिक व मॉर्डन असा मिक्स लूक देतील.
५. संपूर्ण पारंपारिक पेहरावात दागिने महत्त्वाची भुमिका बजावतात, त्यामुळे ठुशी, चिंचपेटी, नथ, कुडी, बाजूबंद यांसारखे मोत्याच्या दागिन्यांचे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत.
६. हेवी दागिने घालण्याची आवड असेल, तर कमी वर्क असणारी साडी निवडा व अनारकली किंवा साडी हेवी वर्कची असेल, तर दागिने नाजूक व शक्यतो कमी घाला.
७. भडक मेकअप टाळून लाईट व वॉटरप्रुफ मेकअपला प्राधान्य द्या. डोळ्यांचा मेकअप हा पेहरावाच्या रंगानुसार असावा, तसेच डोळ्यांना बोल्ड किंवा स्मोकी मेकअप करण्याचा ट्रेंड सध्या दिसून येतोय.
८. चेह-याला गुलाबपाणी लाऊन मगच बेस मेकअप लावण्यास सुरुवात करा व मेकअपसाठी ब्रॅंडेड वस्तू वापरण्यावरच भर द्या.

मैत्रिणींनो! तुम्हाला नटण्याची फार आवड असून नेहमीच पेहरावाचे नवनवीन पर्याय तुम्ही निवडत असता, म्हणूनच वरील ‘लग्न-स्पेशल’ फॅशन टिप्स अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होताना तुम्हाला देईल आकर्षक लुक!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares