Dream Home Banner

स्वत:चं पहिलं घर विकत घेताना…

स्वतःच घर असावं हे प्रत्येक गृहिणीच स्वप्न असतं.घराबद्दलचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवताना तारेवरची कसरत करावीच लागते. घर खरेदी करताना काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
घराचं ठिकाण, आपलं बजेट, कर्जाची रक्कम आणि त्यानुसार येणारं नियोजन या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. अर्थात पैशांची जुळवाजुळव म्हणजे स्त्रियांची महत्त्वाची भूमिका आलीच, नाही का ? पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना प्रत्यक्ष व्यवहाराची प्रक्रिया देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

घराच्या बाबतीत स्त्रिया जरा जास्तच स्वप्नाळू असतात, पण आपले घर भविष्यात कोणत्याही कायदेशीर भोवऱ्यात येणार नाही यासाठी सुरुवातीपासून कागदोपत्री प्रक्रियांच्या बाबतीत खबरदारी अतिशय आवश्यक आहे.

घर खरेदी करताना इस्टेट एजंट महत्वाची भूमिका बजावतात हे जरी खरे असले तरी कायदेशीर प्रक्रियांच्या बाबतीत कधीही इस्टेट एजंटवर संपूर्णतः अवलंबून राहणे चुकीचे आहे. कागदपत्रांच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतः खात्री करून घ्यायला हवी

घर खरेदीचे साधारण ३ प्रकार असू शकतात :

१) स्वतःची जागा खरेदी करून त्यानंतर घर बांधणे

२) बिल्डरकडून जागा खरेदी

३) पुनःविक्रीतील खरेदी ( रिसेल )

यानुसार कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्यायला हवी. त्यासाठी योग्य सल्ला आवश्यक आहे.

आर्थिक बाजू सांभळण्यात स्त्रीयांचा देखील हातभार असतो. त्याचप्रमाणे अशा महत्त्वपूर्ण व्यावहारिक गोष्टींची माहिती देखील असणे आवश्यक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares