investment banner

गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे आपण जाणतोच. आपली स्वप्न पूर्ण करायला किंवा भविष्यात अचानक येणाऱ्या अडी-अडचणींमध्ये उपयोगी पडते ती आपण केलेली गुंतवणूकच; पण गुंतवणूक करायची तरी कुठे याबाबतीत प्रश्नचिन्ह असते. गुंतवणूक करून पैशांच्या बाबतीत असुरक्षितता कधीही असू नये. त्यामुळे आपण स्त्रियांनी देखील सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांचा शोध घेतला पाहिजे त्यातील काही पर्याय पुढीलप्रमाणे :

१. सोने किंवा घर खरेदी :
स्त्रियांना दागिन्यांची खूपच आवड असते. पण हौस म्हणून सोन्याच्या दागिन्यांकडे बघण्यासोबतच एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील आपण त्याकडे पाहू शकतो. सोन्यात गुंतवणुकीचे आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला‘फिजिकल फॉर्म’ मध्ये सोने बाळगावे लागत नाही. सोन्याचे वजन नमुद केलेली सर्टिफिकेट स्वत:कडे बाळगता येतात. त्याचबरोबर सेकंड होमचा देखील तुम्ही विचार करू शकता यासाठी शहरापासून दूर स्वस्त आणि आपल्या बजेटमध्ये असेल तर घराचा गुंतवणूकीचा पर्याय म्हणून नक्की विचार करा.

२. पेन्शन योजना :
सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळतेच असे नाही; पण भविष्याच्या दृष्टीने पेन्शन सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. म्हणून गुंतवणुकीसाठी असलेल्या वेगवेगळ्या पेन्शन योजनेमध्ये पैसे गुंतवणे उचित ठरते.

३. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना :
यामध्ये एकाच्या नावे किंवा संयुक्त खाते देखील उघडता येते. या योजनेत गुंतवणुकीवरील व्याज हे दर महिन्याला मिळते.

४. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी public provident fund :
पोस्ट कार्यालये, स्टेट बँक ऑफ इंडिया, काही सार्वजनिक उद्योगातील बँकांच्या काही शाखा व आयसीआयसीआय बँकेच्या काही शाखा येथे हे खाते उघडता येते. या योजनेतील व्याज हे करमुक्त आहे.

असे सुरक्षित गुंतवणुकीचे विविध पर्याय आहेत याव्यतिरिक्त नॅशनल पेन्शन सिस्टिम, इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्स तसेच शेअर आणि शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक असे देखील सुरक्षित किंवा कमी जोखीमेचे पर्याय असू शकतात. त्याबद्दलचे सविस्तर तपशील जाणून घ्या जेणेकरून तुम्ही गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असाल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares