plastic money banner

व्यवहारात सुरक्षित ‘प्लॅस्टिक मनी’!

जगभरातील देशांचे ‘विकसित देश’ व ‘विकसनशील देश’ असे ढोबळमानाने दोन प्रकार पाडले जातात. व्यक्तिंच्या मानसिकतेवर देखील देशाच्या आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब दिसून येते. आर्थिक क्षेत्रात झालेल्या बदलांचा स्वीकार करण्यात असमानता असलेली जाणवते. ‘प्लॅस्टिक मनी’ ही संकल्पना परदेशात फार पूर्वी उदयास आली व लोकाश्रय मिळवत कायमची रुढ झाली. या तुलनेने भारताचा विचार करता प्रथम बहुतांश नागरिकांमध्ये प्लॅस्टिक मनी म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांच्या वापराबाबत अनभिज्ञता तसेच, असुरक्षितता दिसून येते मात्र, मागील काही वर्षांपासून भारतातील मध्यमवर्गीय देखील ‘कार्ड्स’ संस्कृतीला आपलसं करु लागले आहेत. आवश्यक असलेली रक्कम ‘एटीएम’मधून काढून घेण्याची परंपरा थोडी जुनी झाली असून, शॉपिंगसाठी किंवा व्यापारी स्टोअर्समध्ये कार्ड  स्वाईप करण्याची सोय केलेली असल्याने रोखीने पैसे जवळ बाळगावे लागत नाहीत व त्यामुळे पैसे चोरीला जाण्याचा धोका टाळता येतो.

कार्ड्सने खरेदीचे व्यवहार कल्याने होणारे फायदे समजून घ्यायला हवेत. ज्याप्रमाणे, बॅंकेकडून रिवॉर्ड पॉईंट्सची प्राप्ती होते. या पॉईंट्सचे संचयन व्हायला वेळ लागत असला, तरी हे लक्षात घ्यायला हवे की, रोख रक्कम खर्च केल्यास त्याबदल्यात होणारा फायदा शून्य असतो. तसेच, विशिष्ट खरेदीवर बॅंक काही खास डिल्स जाहीर करते किंवा ५ टक्के कॅशबॅक सारख्या विविध ऑफर्सची रेलचेल सुरु असल्याने फायदा होतो. बॅंकेतून जेवढ्यास तेवढी रक्कम काढल्यामुळे व्याजाच्या आकड्यात मोठा फरक पडत नाही. क्रेडीट कार्डच्या वापराचे आणखी दोन महत्त्वाचे फायदे आहेत ते म्हणजे, खर्च केलेल्या रकमेची परतफेड ताबडतोब न करता २५ दिवसानंतरसुद्धा करु शकतो अथवा परतफेड टप्प्याटप्प्याने करायची असल्यास खरेदीला ईएमआयमध्ये रुपांतरित करता येते.

कार्ड्स मनी वापरण्याचे फायदे व तोटे अभ्यासायला हवेत, कारण क्रेडीट किंवा डेबिट कार्डची सुरक्षितता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कार्डचा पिन क्रमांक, कार्डच्या मागील बाजूस असणारा सीव्हीव्ही क्रमांक कुणालाही सांगू नये तसेच, अधिक सुरक्षिततेसाठी ‘चिप व पिन’ कार्डची सुविधा उपलब्ध आहे. कार्ड हरवल्यास त्वरित बॅंकेला कळवावे, जवळपास प्रत्येक बॅंक ‘झीरो लॉस्ट कार्ड देय’ ऑफर करत असल्याने, चोरी झालेल्या कार्डमुळे खात्यामधून कोणतीच रक्कम कमी होत नाही किंवा व्यवहार होत नाहीत ते पूर्णपणे सुरक्षित रहातात. अशाप्रकारे, प्रचंड सुविधा व मूल्य प्रदान करणा-या कार्डच्या वापरासंदर्भातील सर्व बाबी नीट समजून घेतल्यास रोख रक्कम जवळ न बाळगता खरेदीचा आनंद घेऊ शकता स्मार्टली!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares