मनोरंजनात नको ‘गॅप’, आलयं झी मराठी ‘अॅप’!

मनोरंजनात नको ‘गॅप’, आलयं झी मराठी ‘अॅप’!

टेक्नोलॉजी दर दिवशी आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येते, जी आपली वेळखाऊ कामे सोप्पी करुन पावलोपावली आपल्याला साथ देतेय. घरातील एक जागा धरुन बसलेल्या डेक्सटॉप नंतर आपल्यासोबत प्रवास करु शकणारा लॅपटॉप आला आणि आता तर मोबाईलवरील बटणे जाऊन क्लिकची परंपरा जन्मास आली. स्मार्ट फोनसारख्या छोट्या डबीमध्ये सारे विश्व सामावले व आपल्यासमोर खुल्या झालेल्या मनोरंजनाच्या दालनात ‘झी मराठी अॅप’द्वारे आपल्या आवडत्या वाहिनीने प्रवेश केला.

लाडक्या रसिकप्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनीने सुरु केलेल्या मोबाईल अॅपमुळे आता आपण कुठेही आणि केव्हाही आपल्या मनपसंत कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतो. या अॅपमुळे झी मराठीवरील जुन्या मालिका पुन्हा पाहाणे सहज शक्य झाले आहे, त्या मालिकांमधील पात्रांची धम्माल मस्ती अनुभवता येणारा फक्त एका क्लिकवर, यासोबत सुरु असणा-या कार्यक्रमांचे भाग देखील येथे उपलब्ध आहेत. ‘अस्सल मराठी’ या विभागात फिदीफिदी, लढबाप्पू, कलाकट्टा, खजिना, मनासज्जना माहितीपर या पर्यायांतर्गत सामान्य ज्ञानासोबत मालिका व त्यातील पात्रांवर आधारित विनोद आपले निखळ मनोरंजन करतात, ज्यावर आपण आपल्या प्रतिक्रियासुद्धा देऊ शकतो.

या व्यतिरिक्त नवनवीन रेसिपीजच्या शोधात असणा-या खाद्यप्रेमींना ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांत प्रदर्शित झालेल्या रेसिपीजची मेजवानी  इथे मिळेल! तुम्ही स्वयंपाक घरात नेहमीच नवे प्रयोग करत असता, विविध राज्यांमध्ये बनणारे पारंपारिक पदार्थ किंवा देशोदेशी बनणा-या खास डिश घरी बनवून पाहायला तुम्हाला आवडतात. गोड, तिखट, आबंड, कडू अशा विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असणा-या खवय्यांना ‘आम्ही सारे खवय्ये’मधील शेफ स्पेशल किंवा सेलिब्रेटी स्पेशल सारख्या सा-याच रेसिपीज नोंदवून ठेवाव्याशा वाटतात, पण ब-याचदा साहित्य किंवा पाककृती लिहून घेणे शक्य नसते, अशावेळी उपयोगी पडते ‘झी मराठी अॅप’! इथे या कार्यक्रमाचे व्हिडिओज् उपलब्ध असल्याने पाककृती समजून घेणे अधिक सोप्पे जाईल व भरपूर नवीन पदार्थांचा खजिना तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होईल.

दिवसभरात कधीही व कुठेही झी मराठी वरील कार्यक्रम पाहाण्याची झालेली इच्छा, आता हमखास पूर्ण होणार;  कारण हे ‘अॅप’ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मनोरंजनाची पर्वणी देण्यासाठी कायम असेल सज्ज!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares