mobile app (1)

मोबाईल ‘अॅप्स’ सोडवतील प्रश्न!!

मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या स्मार्ट फोनने घडवलेली क्रांती आपण उपभोगतो आहोतच! सर्वसामान्यांना परवडणा-या दरात हे फोन उपलब्ध झाल्याने त्यांचे प्रमाण अधिक वाढले. बाजारात येणारे स्मार्ट फोनचे प्रत्येक नवे मॉडेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सुविधा घेऊन येताना दिसते. मोबाईल कंपन्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्मार्ट फोनला अधिकाधिक बुद्धिमान बनवू पाहातायेत, तर दुस-या बाजूला विविध अॅप्लिकेशन्स उपभोगत्यांची दैनंदिन कामे सोप्पी करण्याच्या ध्यासाने झपाटलेली दिसतायेत. या माहितीपर ब्लॉगमध्ये अशाच काही उपयुक्त मोबाईल अॅप्लिकेशन्सची आपण ओळख करुन घेणार आहोत, जी तुमच्या मोबाईलला बनवतील एक्स्ट्रा स्मार्ट!!
‘पिनकोड’
वेगवेगळ्या प्रकारची संख्यात्मक माहिती पुरवणारे हे ‘पिनकोड’ नावाचे अॅप्लिकेशन, ज्यामध्ये देशांतर्गत पिनकोड, एसटीडी कोड, वाहनांचे नंबर, बॅंकेचे कोड, टोल फ्री क्रमांक अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील अत्यावश्यक आकडेवारी या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शोधता येणे सहज शक्य आहे.

‘रेलयात्री’
संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे आणि आजही मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग रेल्वेलाच प्राधान्य देताना दिसतो. तुम्ही सुद्धा जर रेल्वेने प्रवास करणारे असाल, तर ‘रेलयात्री’ हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे. रेल्वेकडून प्रसिद्ध केली जाणारी अधिकृत निवेदने, भारतातील रेल्वेची वेळापत्रके तसेच, सीटची उपलब्धता, बर्थ पोझिशन, फूड बुकींग अशा सेवांची माहिती मिळते.

‘इनशॉर्ट’
समाजात घडणा-या घडामोडींचे अपडेट्स कमी व नेमक्या शब्दांत तुमच्यापर्यंत पोहोचवणारे एक महत्त्वपूर्ण अॅप म्हणजे ‘इनशॉर्ट’! रोजच्या घाईगडबडीत बातम्यांचे सविस्तर वाचन करणे शक्य नसते, अशावेळी फक्त मुख्य किंवा दखल घेण्याजोग्या बातम्यांची माहिती ६० किंवा त्यापेक्षा कमी शब्दांमध्ये वाचकांपर्यंत पोहोचवली जाते या ‘अॅप’द्वारे!

‘हेप्टिक’
तुमच्या पर्सनल असिस्टंटची भुमिका वठवणारे हे ‘अॅप’! घरातील फर्निचरची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक सुतार शोधत असाल किंवा एखाद्या ठिकाणी कसे पोहोचावे याची माहिती मिळवत असाल, तर हे ‘अॅप’ वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यात तुम्हाला नक्की मदत करेल.

मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या मदतीने कठीण वाटणारी कामे चुटकीसरशी करता येतात व आपला वेळही वाचतो. अशाप्रकारे, टेक्नोलॉजीचा मनसोक्त आनंद घ्या अधिक सोप्प्या पद्धतीने!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares