750x305

तंत्रज्ञान मातृत्त्वासाठी आशेचा किरण!

आई होण्यासारखं सुख अवघ्या जगात नाही हे अगदी शाश्वत सत्य आहे. प्रत्येक स्त्रीला हे आईपण अनुभवणं हवं असतं;पण काही मर्यादा किंवा अडचणींमुळे या गोष्टी नैसर्गिक सहजतेने होऊ शकत नाहीत आणि पदरी निराशा पडते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मातृत्वाच्या सुरळीत प्रक्रियेमध्ये पती-पत्नीमध्ये शारीरिक अडचणी येऊ शकतात.

या अडचणींवर मात करण्यासाठी IVF तंत्रज्ञान आशेचा किरण ठरू शकतो. वंधत्त्व, मासिक पाळी संबंधी तक्रारी, अंडाशयासंबंधी अडचणी, वय वाढीमुळे गरोदरपणासाठी प्रश्न उभे करतात. म्हणूनच IVF तंत्रज्ञान प्रक्रिया उपयोगी पडू शकते.

सुरुवातीला ही प्रक्रिया खर्चिक होती;पण आता अगदी परवडणाऱ्या फीमध्ये ही प्रक्रिया अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.

सरोगेसीसाठी देखील IVF तंत्रज्ञानाचा फायदा होतो.

डॉक्टरांचा सल्ल्याने गरोदरपणामध्ये नीट काळजी घेतली तर बाळाचा जन्म सुखरूप होऊन सुरक्षित मातृत्त्व मिळू शकते.

या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेली उपचार पद्धती यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आहे.

मानसिक दडपण आले तरी तंत्रज्ञानाकडे सकारात्मकतेने पाहिले तर मातृत्त्व मिळवण्याचा प्रवास आणि आनंददायी होऊ शकेल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares