BACK FROM KIDS (1)

लहान मुलांसाठी बॅंकेचे व्यवहार!

लहान मुलांच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्याच्या उत्साहामुळे नेहमी वेगवेगळे प्रश्न पडत असतात व सतत त्यांना मोठ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकण्याची देखील इच्छा असते. ज्याप्रमाणे, घरातील पैशाचे व्यवहार, बॅंकेची कामे यासा-यापासून लहान मुलांना त्यांच्या वयोमानाचा विचार करुन ब-याचदा दूर ठेवले जाते आणि, ‘हे मोठ्यांचे काम आहे, यामध्ये आपण पडू नये’, ‘मोठ्यांच्या कामात ढवळाढवळ करु नये’, ‘तूला समजणार नाही तू लहान आहेस’ असे सांगितले जाते, अशामुळे ती आणखी हट्टी होतात. हीच पालक व मुलं यांच्यामधील वाद विवाद सुरु होण्याची चाहूल असते.

लहान मुलांना समजणार नाही अशा व्यवहारापासून त्यांना दूर ठेवणे योग्य असले, तरी बॅंकेची कामे समजून घेण्याला कुठलेही वयाचे बंधन नाही. त्यामुळे, लहान वयातच त्यांना बॅंकेची गुंतागुंतीची प्रकीया समजावून सांगण्यास सुरुवात करावी, यामुळे अप्रत्यक्षरित्या पैशाचे महत्त्व देखील त्यांच्या लक्षात येते. बॅंकेत जाताना सोबत त्यांनाही घेऊन जावे, कारण लहान मुलांची निरीक्षण शक्ती चांगली असल्याने ब-याचशा गोष्टी फक्त निरीक्षणातून ते सहज आत्मसात करतात. हल्ली लहान मुलांचे बचत खाते उघडता येते त्याचा उपयोग करावा. यामुळे त्यांना खाऊसाठी दिलेली रक्कम देखील ते मोठ्या आनंदाने साठवू लागतील आणि त्यांनी साठविलेल्या पैशातून तुम्ही त्यांनाच काही वस्तू घेण्यास सांगू शकता ज्यामुळे तेही खुश होतील.

एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी कधी कधी मुले खूपच हटट् करतात, अशावेळी त्यांना ठाम नाही सांगून अनावश्यक गोष्टींपेक्षा पैशाचे महत्त्व अधिक असल्याचे समजावून सागांवे. लहानपणापासूनच जर मुलांच्या हट्टावर नियंत्रण ठेवले, तर भविष्यासाठी त्यांचा बचतीचा दृष्टिकोन घडविण्यासाठी हे उपयुक्त ठरते. लहानपणापासून बॅंकेचे व्यवहार समजून घेतल्याने ते किचकट न वाटता, त्यांना सोप्पे वाटून गुंतवणूकीच्या विविध पर्यार्यांचा, बॅंकेकडून दिल्या जाणा-या सोयी सुविधांचा ते योग्यरित्या उपयोग करतील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares