Winners

नसीमा हुरझुक

अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची. नसीमा हुरजूक या गेली ३२ वर्षे याच आधारस्तंभाचे कार्य करीत आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी पाठीच्या दुखण्यामुळे त्यांना अपंगत्व आलं. अशा कोवळ्या वयात चाकाची खुर्चीही न पाहिलेल्या नसीमांना नकारात्मक विचारांनी घेरलं. त्यांच्या मनात आत्महत्त्येचे विचार येतं. १९६७ सालची घटना, त्यावेळी अपंग पुर्नवसनाच्या कुठल्याही सोयी महाराष्ट्रात नव्हत्या.

याच दरम्यान त्यांची भेट समान शारिरीक अडचणींशी सामना करणा-या बाबूकाकांशी झाली आणि त्यांना जीवनाकडे पाहाण्याची नवी दृष्टी मिळाली. त्या म्हणतात, “पूर्वी स्वत:चे भवितव्य काय? या विचाराने झोप उडायची. आता इतर हजारो- लाखो अपंगांचे भवितव्य कसे उज्ज्वल करता येईल या विचाराने झोप उडते”. त्यांचे ध्येय निश्चित झाले. जणू त्यांचा पुनर्जन्मच झाला होता. अपंगत्त्वाशी झगडणा-या असंख्य व्यक्तिंच्या भविष्यासाठी नव्या उमेदीने त्या कार्य करु लागल्या.

‘हेल्पर्स ऑफ दी हॅन्डिकॅप, कोल्हापूर’ या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना कॅलिपरचा पुरवठा केला. अपंगांनी अपंगांसाठी साधने बनवावीत या उद्देशातून १९९३ मध्ये ‘अपंगार्थ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र’ सुरु केले. अपंगांसाठी ‘घरौंदा’ वसतिगृहाची स्थापना केली. घरौंदा वसतिगृहाचा आतापर्यंत २,५२३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. प्रबुद्ध भारत शाळेचा अपवाद वगळता घरौंदाच्या अपंग मुलांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश नाकारला गेला. ह्यातूनच जन्माला आली हेल्पर्सची स्वत:ची प्रशस्त शाळा ‘समर्थ विद्यामंदिर.’ इथे सन २००० पासून अपंग व सुदृढ असे ५१३ विद्यार्थी-विद्यार्थिनी (बालवाडी ते १० वी) शिक्षण घेत आहेत.

नसीमांनी आपल्या कार्यातून अपंगांना सोयी सुविधा, साधने पुरवली मात्र, त्याचसोबत मानसिक बळ व स्वाभिमानाने जगण्याचे धैर्य दिले. त्यांची जीवनाकडे पाहाण्याची सकारात्मकता आता त्यांच्या विद्यार्थ्यांमध्येही दिसते आहे.

उंच माझा झोका पुरस्कार 2016
  • Usha Madavi

    Desert Saver

     

    गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

  • Taramati Matiwade

    International Yatching player

     

    पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

  • Swati Sathe

    Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

     

    कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

  • Harshada Devdhar

    Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

     

    समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

  • Priti Patkar

    Social

     

    १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

  • Dr. Smita Lele

    Science and Technology

     

    स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

  • Kavita Jadhav

    Bidve

     

    शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquare