Winners

स्मिता लेले

स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली. शालेय वयापासूनच अभ्यासू व मेहनती वृत्तीच्या स्मिताने १९७१ साली दहावीच्या मेरीट यादीत क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी आय सी टी (इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी) ला प्रथम भेट दिली. तेथील प्रयोग शाळेत काही रसायनशास्त्राचे प्रयोग त्यांनी पाहिले त्यांना ते आवडले व या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा त्यांना झाली. रसायन क्षेत्रातील प्रयोग, तेथील संशोधनपर वातावरण या सा-याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ह्या भेटीनंतर त्यांनी रसायन अभियांत्रिकीसाठी आय सी टी ला प्रवेश घेण्याचे निश्चित केले.

१९७७ साली आय सी टी मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. हिंदूस्तान लिव्हर मधील संशोधन विभागात कार्य करणा-या त्या पहिल्या महिला इंजिनिअर ठरल्या. पुरुषांची मक्तेदारी असणा-या या क्षेत्रात एक महिला संशोधक रुजू झाल्यामुळे सहकारी संशोधकांकडून त्यांच्यावर टिकाही झाली. मात्र, महिला संशोधकाबाबत अभिमान बाळगणारे चांगले मित्र देखील मिळाले. “कुठलेही क्षेत्र स्त्रीत्वाचा बाऊ करीत नाही तर, आपण तरी तो का करावा” अशा सकारात्मक विचारांची कास धरणा-या स्मिता लेलेंनी जिद्दीने आपले कार्य करीत राहिल्या.

१९८६ साली स्मिता आय सी टी ला शिक्षक म्हणून रुजू झाल्या सोबतच, १९९० साली डॉक्टरेट पदवी मिळवली. त्यानंतर आय सी टी मधील पदार्थ विभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवला गेला. रसायन अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल २०१० साली फेलो बायोटेक रिसर्च ऑफ इंडीया पुरस्कार, २०११ साली डॉ. बायन्स जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले.

उंच माझा झोका पुरस्कार 2016
  • Naseema Hurzuk

    Chairman, Helpers of Handicap Society

     

    अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

  • Usha Madavi

    Desert Saver

     

    गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

  • Taramati Matiwade

    International Yatching player

     

    पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

  • Swati Sathe

    Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

     

    कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

  • Harshada Devdhar

    Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

     

    समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

  • Priti Patkar

    Social

     

    १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

  • Kavita Jadhav

    Bidve

     

    शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquare

Please wait...