Winners

Swati Sathe

कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते. बहुतांशवेळा सामान्य व्यक्तिला जेलच्या आसपासच्या परिसरातून जाताना देखील भीती वाटते. भयकंर व विकृत मनोवृत्ती या कारागृहात वावरत असल्याचे दडपण असतेच आणि अशा धोकादायक वातावरणाचा कारभार सांभाळण्यासाठी १९९५ साली एक ‘स्त्री’ रुजू होते ती म्हणजे ‘स्वाती साठ्ये’. कारागृह निरीक्षक म्हणून स्वाती यांनी पदभार स्विकारला याची तत्कालीन कर्मचा-यांनी थट्टा केली तसेच, त्यांना पदावरुन दूर करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र, करारी स्वभावाच्या ‘स्वाती’ अशा फुटकळ टिकाकारांना धजल्या नाहीत. पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव असणा-या समाजात स्त्रीने धोकादायक क्षेत्रात कार्य करणे हीच आश्चर्याची बाब ठरते आणि असामान्य क्षेत्र निवडणा-या अशा स्त्रीला सामना करावा लागतो तो आव्हानांचा. अडचणींवर मात करीत स्वाती यांनी एक निर्भिड अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर १३ वर्षे यशस्वीरित्या कार्यभार सांभळणा-या स्वाती साठ्ये सध्या येरवडा कारागृहात उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

‘ती’ने ठरवले तर, अशक्य असे काही नाही याचे स्वाती साठ्ये हे व्यक्तिमत्त्व एक आदर्श उदाहरण आहे

उंच माझा झोका पुरस्कार 2016
 • Naseema Hurzuk

  Chairman, Helpers of Handicap Society

  अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

 • Usha Madavi

  Desert Saver

  गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

 • Taramati Matiwade

  International Yatching player

  पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

 • Harshada Devdhar

  Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

  समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

 • Priti Patkar

  Social

  १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

 • Dr. Smita Lele

  Science and Technology

  स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

 • Kavita Jadhav

  Bidve

  शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquares