Winners

तारामती मातिवडे

पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू ‘तारामती मातिवडे’ हीचा देखील समावेश आहे. भारतातील पहिल्या क्रमांकाची तर, सहा वेळा आशयातील तिस-या क्रमांकाची यॉटींगपटू म्हणून तिला गौरवले गेले आहे. जगभरातील महिला यॉटींगपटूंमध्ये २२वे स्थान पटकावणा-या तारामतीने या साहसी खेळ प्रकारात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

शालेय वयापासूनच रोकठोक, धाडसी अशी टॉम बॉय व्यक्तिमत्त्वाची तारामती बाईकवरुन कॉलेजला जात असे. अभ्यासासोबतच विविध खेळांत सहभाग घेत असल्याने तिच्या शाळा कॉलेजचे नाव तिच्या विविध क्रिडा स्पर्धेतील यशामुळे नेहमीच झळाळत राहीले. एनसीसीने आयोजलेल्या विविध कॅम्प्सतर्फे अशा खेळांशी तिची जवळून ओळख झाली. कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय निरीक्षणाच्या जोरावर व स्वअध्ययनाने तीने ओरीसातील चिलका खलाशी स्पर्धा जिंकली व सुवर्ण पदकाची ‘ती’ मानकरी ठरली. महिला विविध क्षेत्रात प्रवेश घेऊन थांबत नाहीत तर प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतात. तारामती त्याचेच आदर्श उदारहण. पाण्याशी खेळ म्हणजे तितकाच धोका, वेगवान लाटांमुळे बोटी पलटण्याची शक्यता, अशा अस्थिर परिस्थितीत स्थिर मनाने विचार करण्याची मानसिकता व खेळावरील प्रेम हे तारामतीला ‘यॉटींगपटू तारामती’ बनवतात.

२०१० साली लिमका बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड, भारतातील पहिली महिला यॉट मास्टर २०१३, बेस्ट लेडी सेलर २०१० अशा विविध पुरस्कारांनी राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर तिला सन्मानित केले आहे. ‘यॉटींग एसोसिएशन ऑफ कोल्हापूर’ची सर्वेसर्वा असलेल्या तारामती यॉटींग या संस्थेच्या माध्यमातून साहसी खेळाची ओळख लोकांना करुन देते तसेच, यॉटींग या क्षेत्रातील करियरच्या संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ती करीत आहे. समुद्राला आव्हान देणा-या ‘धाडसी’ तारामतीस सलाम!

उंच माझा झोका पुरस्कार 2016
  • Naseema Hurzuk

    Chairman, Helpers of Handicap Society

     

    अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

  • Usha Madavi

    Desert Saver

     

    गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

  • Swati Sathe

    Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

     

    कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

  • Harshada Devdhar

    Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

     

    समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

  • Priti Patkar

    Social

     

    १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

  • Dr. Smita Lele

    Science and Technology

     

    स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

  • Kavita Jadhav

    Bidve

     

    शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquare