Winners

कविता जाधव

शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. वडील शेतकरी, आई नगरपालिकेत नोकरीला. घरात शेती व शिक्षण असं दोन्ही प्रकारचं वातावरण कविता यांना लाभलं. विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर दंतवैद्यक शाखेत मिळत असलेला प्रवेश नाकारुन कृषी विज्ञान क्षेत्राची त्यांनी निवड केली. वडीलांच्या इच्छेनुसार कृषी सेवा केंद्र सुरु करण्याचे निश्चित केले पण, पदवीधर असूनही मुलगी आहे म्हणून केंद्रासाठी परवाना नाकारला जाण्याच्या दुर्दैवी मानसिकतेचा सामना त्यांना करावा लागला. रोजचे हेलपाटे, कटकटी यांसोबत अधिका-यांचा नकारनामा होताच, मात्र “एकदा निर्णय झाल्यावर माघार नाही”, असं म्हणंत जिद्दी कविता यांनी परवाना मिळवलाच.

२००६ साली स्वत:च्या जमिनीवर कृषी केंद्र सुरु केलं. पुढे गावक-यांचा विश्वास जिंकण्याचं नवं आव्हान कविता यांच्यासमोरं होतं. त्यांनी फिल्ड व्हिझीट सुरु केल्या. शेतक-यांचे प्रश्न समजून घेऊन उपाय सुचवले. हळूहळू शेतक-यांचा विश्वास बसला, ते स्वत:हून कृषी केंद्राकडे वळू लागले. कविता यांनी २००९ साली राहुरी येथे दुस-या कृषी केंद्राची स्थापना केली. २०१२ साली ऍग्री मॉल तसेच, माती व पाणी यांच्या चाचण्या करणारी प्रयोगशाळा सुरु केली. त्या म्हणतात, “आपला सल्ला ऐकून एखाद्या शेतक-याचं नुकसान कमी झालं किंवा पीक वाचलं हे ऐकण्याचं समाधान खूप मोठ्ठं आहे.” शिक्षणाला अथक प्रयत्नांची जोड देत कृषी क्षेत्रात ‘एक यशस्वी उद्योजिका’ अशी ओळख निर्माण करणा-या कविता जाधव यांना आदर्श उद्योजक(नगर जिल्हा), आदर्श उद्योजक(बारामती जिल्हा), महाराष्ट्र उद्योगिनी(सकाळ) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वडीलांच्या स्वप्नाला स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर साकार करणा-या कविता जाधव यांचे शेती क्षेत्रातील हे योगदान मोलाचे आहे.

उंच माझा झोका पुरस्कार 2016
 • Naseema Hurzuk

  Chairman, Helpers of Handicap Society

   

  अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

 • Usha Madavi

  Desert Saver

   

  गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

 • Taramati Matiwade

  International Yatching player

   

  पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

 • Swati Sathe

  Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

   

  कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

 • Harshada Devdhar

  Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

   

  समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

 • Priti Patkar

  Social

   

  १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

 • Dr. Smita Lele

  Science and Technology

   

  स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

Designed and Developed by SocioSquares