Winners

उषा मडावी

गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री. गावामध्ये ८ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला दारुबंदीसाठीचा लढा यशस्वी झाला. याच उषाताई पुन्हा एकदा कंबर कसून नव्या लढ्यासाठी सज्ज झाल्या. हा लढा होता यंत्रणेशी, अवैध व्यापाराशी, कंत्राटदारांच्या अरेरावीशी, नकारात्मक शक्तींशी त्यामुळे यामध्ये असणारा धोका देखील तितकाच तीव्र असणार याची जाणीव उषाताईंना होती तरीही त्या खचल्या नाहीत.

गावाच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. अवैध कामांवर उषाताई बारीक लक्ष ठेवून होत्या. जंगलातील खनिजे, सागवानाची झाडे, दगड, मुरुम, गिट्टीच्या खाणी यांची सर्रास चोरी होत होती. समितीतील सरकारी सदस्यांचा कामचुकारपणा व सरकारी कर्मचा-यांचा हलगर्जीपणा त्यांच्या लक्षात येताच स्त्री शक्तीच्या साथीने उषा ताईंनी मुख्य लढ्याला सुरुवात केली. सा-याजणी दिवसा तसेच रात्री पाहारा देऊ लागल्या, चोरीचे ट्रक अडवू लागल्या. ह्या कामात त्यांना साथ देणा-या प्रथम तीन जणी होत्या, मग सात स्त्रियांची ही जिद्द पाहून काही पुरुषही गस्त घालण्यास येऊ लागले.

उषाताईंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा, हा संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न झाला, आजही त्या कोर्टाच्या वा-या करीत आहेत. पाच वर्षांच्या लढतीत आधी हेटाळणी करणारे गाव आता उषाताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. त्यांच्या या संघर्षामुळे ५०० एकर जंगलाची चोरी जवळ जवळ थांबली आहे. जंगलातील नदी व नाल्यातून वाळूच्या होणा-या चोरीला देखील जरब बसलाय. त्यामुळे, उन्हाळ्यातही गावाला मुबलक पाणी मिळू लागले आहे. आता, वनराई देखील बहरली आहे.

उषा ताईंचा जंगल वाचवण्यासाठीचा संघर्ष व त्यासाठी त्यांनी उभं केलेलं सैन्य, सा-यांनी मिळून दिलेला लढा यशस्वी झालायं. माणसांनी माणसांसाठी एक जंगल वाचवलयं.

उंच माझा झोका पुरस्कार 2016
 • Naseema Hurzuk

  Chairman, Helpers of Handicap Society

   

  अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

 • Taramati Matiwade

  International Yatching player

   

  पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

 • Swati Sathe

  Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

   

  कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

 • Mrs. Harshada Devdhar

  Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

   

  समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

 • Priti Patkar

  Social

   

  १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

 • Dr. Smita Lele

  Science and Technology

   

  स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

 • Kavita Jadhav

  Bidve

   

  शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquares