work work (1)

‘Work from Home’चे पर्याय!

आर्थिक स्थैर्य मिळवायचे, तर नोकरी किंवा व्यवसाय यापैकी एकाची निवड करणे अनिवार्य  असते. व्यवसाय करावा, तर भांडवल जमवावे लागते आणि नोकरी करावी, तर नेमलेले तास भरण्याचा कित्ता गिरवावा लागतो. ऑफीससोबत घराकामाच्या वेळा सांभाळताना रुटीनमधील तोचतोचपणा प्रकर्षाने जाणवून कामाचा हळूहळू कंटाळा येऊ लागतो. लहान मुलांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. हा पेच सोडविण्यासाठी ‘Work from Home’ पद्धतीची निवड करता येईल. कंपनीमध्ये रुजू व्हायचे, पण नेमून दिलेले काम घरुन करायचे. ज्याला फ्री-लानसिंग असेही म्हटले जाते. यामध्ये काही लघुउद्योगाचे पर्यायही आहेत.

युट्युब चॅनल:

स्वयंपाकात पटाईत असणा-यांना स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करता येईल. पदार्थाचे साहित्य, पाककृती, त्याचे प्रात्यक्षित दाखवणारा व्हिडीओ शूट करुन तो स्वत:च्या चॅनलवर अपलोड करता येईल. या क्षेत्राची व्यवसायिक बाजू नीट समजून घ्यायला हवी.

शिकवणी:

शाळा, कॉलेजमध्ये कुठल्या विषयात तुम्ही ‘लईच हुशार’ होतात?  सगळ्याचं? मग झालं तर, घरच्याघरी शिकवणी सुरु करता येईल. सवय होईस्तोवर लहान इयत्तेपासून सुरुवात करुन पाहा. सरावाने मुलांचा अभ्यास घेणे जमू लागते. तुम्हाला शिकवण्याची आवड असल्यास या पर्यायाचा नक्की विचार करुन पाहा.

ट्रान्सलेटर:

कुठल्याही दोन भाषांवर प्रभुत्व असल्यास, तुमच्याजवळील या ज्ञानाचा योग्य वापर करुन ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतरकाराचे काम करता येईल. एका भाषेतील मजकूर दुस-या भाषेत बिनचूक भाषांतरित करणे मोठ्या कौशल्याचे काम आहे. फ्री-लानसिंग पद्धतीने हे काम करता येऊ शकते.

पार्टी प्लॅनर:

मोठमोठे इव्हेंट मॅनेज करण्या-या कंपनीज छोट्या घरगुती इव्हेंट्सच्या ऑर्डर घेत नाहीत. इतर कामांच्या व्यापात व्यक्तिंना घरगुती पार्टीजची चोख तयारी करणे शक्य होत नाही. अशांना तुम्ही छान पार्टी प्लॅन करुन देऊ शकता. किचनपासून डेकोरेशन पर्यंतची व्यवस्था आकर्षकरित्या पार पाडण्याची जबाबदारी तुमची!

पाळणाघर:

लहान मुलांचा सहवास आवडणा-यांनी पाळणाघर सुरु करण्याचा आवर्जून विचार करावा. सध्या चांगली पाळणाघरे निकडीची बनली असून छोटी कुटुंबे स्वच्छ व नीटनेटक्या पाळघरांच्या शोधात असतात. आई वडील दोघंही नोकरी करणारे, अशावेळी मुलांना दिवसभर कुठे ठेवायचे? वातावरण घरगुती व विश्वासार्ह हवे असते. असे आदर्श पाळणाघर तुम्ही नक्कीच सुरु करु शकता.

स्वत:जवळील कौशल्याचा योग्य वापर करुन सक्षमपणे उभे रहाण्यासाठी सज्ज व्हा. लग्नाआधी किंवा लग्नानंतर फक्त गृहिणी बनून न रहाता, पूर्णवेळ नोकरी करणे शक्य नसेल; तर ‘Work from Home’चा पर्याय आजमावून पाहावा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares