summer 2019 (2)

अशी घ्यावी सुती कपड्यांची काळजी…

घामाच्या धारा शोषून घेत, कडक उन्हाचा त्रास कमी करणारे सुती कपडे सुकतातही झटपट! त्यामुळे, घाम त्वचेवर बराचवेळ राहून खाज येणे, त्वचा लालसर होणे, पुरळ उठणे अशा समस्या  उद्भवत नाहीत. आपली काळजी घेणा-या सुती कपड्यांस आपणही तितकेच जपायला हवे. तरच ते दिर्घकाळ साथ देतील, नाही का? म्हणूनच लक्षपूर्वक वाचा खालील टिप्स!

  1. फिकट रंगाचे सुती कपडे पिवळे पडून वापरातून लवकर बाद करावे लागतात, त्यामुळे पांढ-या किंवा फिकट रंगाचे सुती कपडे धुताना नीळीचे प्रमाण जास्त होऊ देऊ नये.
  2. तसेच, कपड्यावर पदार्थाचे, रक्ताचे वा चिखलाचे डाग पडले असतील, तर लगेचच साध्या पाण्याने तरी डाग धुवून नंतर हे कपडे इतर कपड्यांसोबत बुडवून ठेवावेत.
  3. सुगंधी फवारे किंवा घाम येऊ नये म्हणून वापरल्या जाणा-या रसायनांचे डाग कापडावर दिर्घकाळ राहिल्याने पक्के होतात. त्यामुळे, असे कपडे पुन:पुन्हा न वापरता लगेच धुवावेत.
  4. खूप मळलेले कपडे व कमी मळलेले कपडे एकत्र बुडवून नयेत किंवा धुवू नयेत. हा समान नियम रंगीत व शुभ्र कपडे भिजवताना लक्षात घ्यावा. जेणेकरुन कपड्याचा रंग जात असल्यास फिकट रंगाच्या कपड्यांना तो लागणार नाही.
  5. डिटर्जंट कपड्यांमधून पूर्णत: न निघाल्यास कपड्यांवर काळे पिवळे डाग पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, कपडे हाताने धुवत असाल किंवा वॉशिंग मशीनच्या सहाय्याने कपडे नीट विसळले जाणं गरजेचं आहे.
  6. सुती कपड्यांसाठी स्टार्चचा वापर करत असाल, तर स्टार्चच्या पाकीटावर दिलेल्या प्रमाणानुसारच त्याचा वापर करावा. स्टार्चचे प्रमाण जास्त झाल्यास गडद रंगाच्या सुती कपडे पांढरट दिसू लागतात.

उन्हाळी कपड्यांची काळजीपोटी इतक्या टिप्स तुम्ही फॉलो कराल याची खात्री आहे. यापलिकडे तुमच्याजवळ काही टिप्स असल्यास त्या शेअर करा ब्लॉगखालील comment box मध्ये!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares