online banner

इंटरनेट वापरताना बाळगा सावधगिरी!

Internet हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालेला आहे. सगळी दुनिया आपल्या मुठीत आलेली आहे. बसल्याजागी अगदी क्षणार्धात कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो असे Internet चे वर्णन केले जाते आणि ते अगदी यथायोग्यच आहे; पण Internet च्या वापराबाबत खबरदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

Password:
Internet वापरताना आपले वेगवेगळ्या sites वर accounts असतात. social sites, बँकांचे ऑनलाइन accounts अशा सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो तो आपला password. हा password लक्षात रहावा म्हणून आपण आपले नाव, आडनाव, वाढदिवसाची तारीख असे password ठेवले जातात;पण ते खूपच जोखमीचे असू शकते. म्हणून सहज दुसऱ्याच्या लक्षात येईल असा password ठेऊ नये आणि एकदा नमूद केलेला password नेहमी लक्षात ठेवावा.

Mail:
मेलवर lucky draw सारखे मेल आपली दिशाभूल करू शकतात. त्यामुळे अशा mails कडे दुर्लक्ष करा. या मेलला कधीही प्रतिसाद देऊ नका. अशा घटनेतून हॅकर्स, फसवणूक करणारे आणि गुन्हेगार या तपशीलचा गैरवापर करू शकतात.

Social Media Security:
हे अॅप प्रेग्नसीच्या काळात बाळ आणि बाळाच्या आईच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या अॅपद्वारे तुम्हाला वैयक्तिक प्रेग्नसी बाबत देखील माहिती मिळू शकते. समाविष्ट केलेली माहिती वैद्यकीय तज्ञांद्वारे मान्यता प्राप्त असते. Android फोन मध्ये हे अॅप आपल्याला उपलब्ध होऊ शकेल.

SOS stay safe :
आपलं अवघं जग सोशल मीडियावर सामावलेलं असते. आपली माहिती, फोटो, status updates यासगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सर्रास असतात. पण या सगळ्या गोष्टी upload करताना privacy Security ठेवावी. अशा काही गोष्टींबाबत आपण सतर्क असले पाहिजे त्यातून खऱ्या अर्थाने Internet साक्षरता नक्कीच येईल!

More Articles
Designed and Developed by SocioSquares