BORE MOOD (1)

ऑफिसमध्ये कंटाळवाणे वाटल्यास, ‘हे’ ५ उपाय करा!

शाळा कॉलेजनंतर ऑफिसचं वेळापत्रक मानगुटीवर अगदी कायमचं बसतं. कंटाळा आल्यावर अचानक शाळेला दांडी तरी मारता यायाची; इथे तोही पर्याय नाही. पूर्णपणे घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या या रुक्ष ऑफिस पद्धतीचा, अधून मधून वैताग येणं साहाजिक आहे. याचा परिणाम, मग कामावर दिसून येतो. कामात होणा-या चुका, बसल्याजागी सोबत करणा-या सततच्या जांभया व झोप त्रास देऊ लागते. यावर उपाय म्हणून, तासनतास काम केल्यावर आलेला हा कंटाळा झटकून टाकण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. लक्षपूर्वक वाचा बरं!

  1. कामांची भलीमोठी यादी फस्त केल्यावर, लहानसा ब्रेक घ्याच आणि एखाद्या आवडत्या वेबसाईटला भेट द्या किंवा सरळ एखादे पुस्तक हातात घ्या व त्यातील दोन चार पाने भरभर वाचून काढा. ज्यामुळे, मन थोडं फ्रेश होईल. पुन्हा कामाकडे वळता येईल.
  2. नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणखी एखाद्या हलक्या फुलक्या कामाची जबाबदारी स्विकारता येईल. ज्याप्रमाणे, ऑफिसमधील मनोरंजन कार्यक्रमांच्या तयारीतील सहभाग किंवा ऑफिसमध्ये सणानिमित्त केल्या जाणा-या देखाव्यांमध्ये कलाकुसरीचे काम!
  3. ऑफिसमध्ये नव्याने रुजु झालेल्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही नक्कीच आव्हानात्मक व डोक्याचा त्राण कमी करणारे ठरेल.
  4. एखादवेळी ऑफिसमधील जागा तात्पुरता बदलावी. नेहमीच्या जागेमुळे कामातही एकसुरीपणा येऊ लागतो. म्हणूनच, आजूबाजूचे वातावरण बदलले, की आपसूकच नवेपणा जाणवू लागतो व प्रसन्न वाटते.
  5. कायम साथ देणारी संगीत थेरपी इथेही उपयोगी ठरेल. कामाचा ताण हलका करण्यासाठी, छोटा ब्रेक घेऊन मनपसंत संगीत ऐकावे. दोन चार गाणीही तुमचे मन एकाग्र करण्यास सहाय्यक ठरतील.

 

कामाचा ढिग हसत खेळत मार्गी लावायचा, तर असा काही मिनिटांचा ब्रेक तर हवाच! दिवसातील सर्वाधिक तास ऑफिसच्या कामासाठी राखीव ठेवल्यावर, तितकावेळ उत्साहपूर्वक काम करण्याची मानसिक व शारीरिक तयारीही हवी. यासाठी, कामातून स्वत:ला छोटीशी हक्काची विश्रांती द्यावी!

More Articles
Designed and Developed by SocioSquares