RANGOLI (1)

झटपट बनणा-या रांगोळी डिझाईन्स!

दररोज सडारांगोळीनं सजणारं अंगण आता क्वचितच नजरेस पडतं. जागेच्या कमतरतेमुळे घरासमोर स्वतंत्र्यशी मोकळी जागा असणं तर दूरच, ब्लॉक पद्धतीमध्ये घराची दारंच इतकी जवळ असतात, की दोन घराची दारं एकाचवेळी उघडणंही मुश्किल जातं. त्यामुळे, रांगोळी या अस्सल कलाप्रकाराची आठवण सध्या फक्त सणासुदीला येते. मग, पुरेशी जागा नसल्याने पाटावर, पायरीवर किंवा अगदी घरात रांगोळीला स्थान दिले जातेय. कल्पक युक्त्यांनी रांगोळीच्या प्रकारतही नवनवे बदल घडवलेत. सणांची रेलचेल असणा-या चैत्र महिन्यात झटपट व सोप्या पद्धतीने बनवता येतील अशा विविध त-हेच्या रांगोळीच्या आकर्षक डिझाईन्स देत आहोत.

सर्वप्रथम ठिपकेदार पारंपारिक रांगोळी, ज्यास ‘कणा’ असेही म्हटले जाते. त्यातील अवघ्या ११ ते १२ ठिपक्यांमध्ये साकार होणा-या खालील मोहक आकृत्या झपटट काढूनही होतील. त्यांचा एकूण आकार कमी असल्याने रंग देखील पटकन भरुन होतील. पाहा प्रयत्न करुन.

Rangoli (4)

कुठलीही मोजपट्टी न वापरता, फ्री हॅंड प्रकारात मोडणारी संस्कार भारती रांगोळी काढणे जमू लागली, की हमखास आवडतेच. ह्या रांगोळीचा प्रवास थोडा उलट असतो. प्रथम जमिनीवर चाळणीने रंग टाकून घेतले, की मग त्यावर पांढ-या रांगोळीने विविध आकार काढण्याची पद्धत आहे. खालील आकार या प्रकार सुरखे दिसतील.

Rangoli (3)

आणखी एक साधा सोप्पा प्रकार वर्षानुवर्ष रुढ झालाय, कमीतकमी वेळात काढता येणा-या फुलांच्या रांगोळ्या. ताजी फुले घेतल्यास २ ते ३ दिवस ही रांगोळी छान राहते. खडूने जमिनीवर हवा तो आकार काढून घ्यावा आणि त्यात योग्य रंगसंगती साधत फुलं पसरावीत. आपण लहान जागेत काढता येतील अशा रांगोळ्या आपण पाहतोय, त्यामुळे इमारतीतील पॅसेजमध्ये, पाय-यांजवळील अरुंद जागेत खालील चित्रात दाखवलेल्या फुलांच्या रांगोळ्या काढता येतील. घंगाळ किंवा समईभोवती अशी फुलांची आरास सुरेख दिसेल.

Rangoli (2)

घंगाळ्याच्या भोवताली जशी फुलांची आरास करता येते, तशीच घंगाळ्यात पाण्यावर काढलेल्या फुलांच्या रांगोळ्याही छान दिसतात. कुठलीही फुलं, पानं वापरुन आपण ही रचना करु शकतो. सणासुदीला घराबाहेर किंवा घरात टिपॉयवर, बैठकी शेजारी असे सजवलेले घंगाळ ठेवले, की आपसुकच सणासुदीचा मौहोल बनतो. त्यावर तरंगता दिवा ठेवल्यास, ते पात्र आणखी देखणे दिसते आणि त्याच्याकडे नजर जाताच मनाला अगदी प्रसन्न वाटते.

Rangoli (1)

कधी कधी फार फुलं उपलब्ध नसतात, अशावेळी कमी फुलांत काय करावे? तर त्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करुन खालीलप्रकारे त्यांची सुरेख मांडणी करता येईल. याला आपण एकदिवसीय रांगोळी म्हणू. दिवाळीच्या दर दिवशी अशात-हेची एक नवी रांगोळी काढता येईल.

Rangoli (5)

मैत्रिणींनो, आता थोड्याशा जागेतही मस्त रांगोळी काढता येईल, की नाही? तुम्ही वरीलपैकी जी रांगोळी सर्वप्रथम काढाल, आठवणीने त्याचा फोटो आमच्यासोबत शेअर करा. तुमच्या रांगोळ्या पाहाण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत.

More Articles
Designed and Developed by SocioSquares