Drinking Water

तुमचं वजन सांगेल तुम्ही किती पाणी प्यावं!

निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं, अत्यावश्यक असतं. मात्र, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, त्याला पाणी तरी कसे अपवाद ठरेल. म्हणूनच, कमी किंवा जास्ती नाही, तर योग्य प्रमाणातच  शरीराला पाणी मिळायला हवे.

शरीरात अतिरिक्त पाणी जमा झाल्यास त्याचा रक्तपेशींवर परिणाम होतो. शरीराला सूज येण्याची शक्यता असते. जेवणानंतरही लगेचच भरपूर पाणी पिऊ नये, यामुळे जठराती पाचक रसाच्या कार्यात अडथळा येतो. ज्यातून अपचन, पित्तासारख्या समस्या उद्भवू शकतात.

साधारणत: दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण, इतरही अन्नघटकांतून आपल्या शरीरात पाण्याचा अंश जात असतोच. त्याचा हिशोब आपण करतच नाही. कुणी किती पाणी प्यावं हे ठरवण्याचं काहितरी मोजमाप हवं ना?  एखाद्या तरुण व्यक्तिचे पाणी पिण्याचे प्रमाण हे वृद्ध व्यक्तिच्या पाणी पिण्याच्या प्रमाणाहून नक्कीच भिन्न असतं. तितकच, असमान वजनाच्या व्यक्तिंचं पाणी पिण्याचं प्रमाणही भिन्न असतं. आपण ब-याचदा याबाबत अनभिज्ञ असतो. उगाचच भरपूर पाणी पिण्याची चूक घडण्यापेक्षा पुढील युक्तीने तुम्ही दररोज किती पाणी प्यायला हवे, हे तुम्हाला सहज समजेल.

शरीराच वजनाला ३० ने भागताच हाती येणारे अंक पाणी पिण्याचे प्रमाण सांगतात. उदाहरणार्थ, शरीराचे वजन ६० किलो असल्यास, त्या व्यक्तिने दिवसभरात साधारण २ लीटर पाणी प्यायला हवे. मात्र, फक्त पाणी पिऊन भागायचे नाही, तर तंदुरुस्त स्वास्थ्यासाठी याला व्यायामाची जोड हवी. हे दुर्लक्षून चालायचे नाही बरं…!

More Articles
Designed and Developed by SocioSquares