vegetables banner

निरोगी आरोग्यासाठी आहाराची पंचसूत्र!

आहाराच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली तर आरोग्य निरोगी राहिल हे समीकरण सरळ आहे;पण आहाराबाबत योग्य ती काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं ? त्याबद्दलच आपण जाणुन घेणार आहोत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आरोग्यासंबंधी असलेली ही पाच सूत्रं देत आहोत :

स्वच्छता
अन्नाला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ करा.
स्वयंपाक करताना वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तु जंतुविरहित आहेत का याची खात्री करून घ्यावी.

अन्नपदार्थ
कच्चे मांस, मासे इतर अन्नघटकांपासून वेगळे ठेवा.
शिजलेले अन्नपदार्थ आणि कच्चे अन्नघटक एकमेकांच्या संपर्कात ठेऊ नका.

व्यवस्थित शिजवा
अन्नपदार्थ नीट शिजवून घ्या. विशेषतः मांसाहारी पदार्थ
सुप सारखे पदार्थ ७० डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत शिजवा.
जेवण्याआधी अन्न गरम करावं.

अन्नाचे तापमान
*शिजवलेला आणि लवकर खराब होणारा पदार्थ फ्रिजमध्ये ठेवा. त्याचे तापमान ५ डिग्रीपेक्षा कमी असणं योग्य ठरेल
अन्न खुप दिवस फ्रिजमध्ये ठेऊ नये

स्वच्छ पाणी आणि सुरक्षित घटक
भाज्या/फळे धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा.
आहारात ताज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करा.
Expiry Date नंतर खाद्य पदार्थांचा वापर करू नका.

निरोगी आरोग्य हे आहारावर अवलंबून असते;म्हणूनच आहाराबाबत ही पाच सूत्र तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares