food

पौष्टिक अन्न हे पूर्णब्रह्म !

जेवण्याआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक आपण लहानपणापासून म्हणत आलेलो असतो. त्यातली महत्त्वाची ओळ म्हणजे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’. या पूर्णब्रह्माला पूर्णत्व येण्यासाठी आपण जातीने लक्ष दिले पाहिजे. घाईघाईत जेवणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, फास्ट फूड खाण्याकडे कल या सगळ्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतो. त्यामुळे आपणच स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त पौष्टिक घटक आपल्याला कसे मिळतील यादृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत.

जेवणाची वेळ
तुम्ही गृहिणी असाल किंवा ऑफिसला जात असाल कामच्या ओघात जेवणाची वेळ कधीही चुकवू नका.

आहारात काय समाविष्ट असावे ?
फळ, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, कोशिंबिरी, दूध यांचा समावेश नेहमी आपल्या आहारात असावा. त्याचप्रमाणे मधल्या वेळेत देखील एखादे फळ किंवा ड्रायफ्रुट्स खाणे फायदेशीर ठरू शकते.

उपवास कशासाठी ?
पचनसंस्थेला आराम मिळावा यासाठी उपवास करणे ही चांगली सवय आहे ; पण वजन कमी करण्यासाठी किंवा त्याचप्रकारच्या विचारांमुळे जर उपवास करत असाल तर ते चुकीचे आहे. उपवासाच्या दिवशी देखील पूर्णतः उपाशी राहणे योग्य नाही. त्यावेळी सकस पण हलका आहार घ्यावा.

या अगदी प्राथमिक गोष्टी आहेत पण त्या नित्यनेमाने पाळल्या गेल्या पाहिजेत आणि याकडे पण लक्ष दिले पाहिजे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares