razer (2)

“रेझरचा वापर करता?”, मग हा लेख वाचाच!

पार्लरमध्ये जायचा कंटाळा आल्यावर किंवा फार घाईच्या वेळी वेळ वाचवण्यासाठी महिला रेझरचा पर्याय निवडतात. रेझरचा वापर घातक आहे ठाऊक असूनही, तुम्ही ते क्वचित वापरत असलात तरी थोडी सावधगिरी बाळगाच. पुन्हा जेव्हा कधी रेझरचा वापर करला, तेव्हा पुढील खबरदारी घेण्यास हलगर्जीपणा बिलकूल करु नका.

  1. आधी योग्य रेझरची निवड व्हायला हवी. कुठलेही स्वस्त्यातील रेझर न वापरता औषधांच्या दुकानातूनच ते विकत घ्यायला हवे.
  2. बाजारात दोन प्रकारची रेझर्स उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी त्यांच्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन बनवलेली रेझर्स महिलांनी वापरु नयेत. कारण, अशी रेझर्सनी नाजूक त्वचेस इजा पोहोचवू शकतात.
  3. रेझरचा वापर करण्यापूर्वी प्रथम हातापायांना शुगर स्क्रबच्या सहाय्याने स्क्रबिंग करुन घ्यावं, यामुळे डेड स्कीन सेल्स निघून जाण्यास मदत होईल.
  4. शेविंग करण्यापूर्वी किमान ३ ते ४ मिनिटे हात पाय पाण्यात बुडवून ठेवावेत, जेणेकरुन त्वचा मऊ होईल.
  5. त्यानंतर, रेझर त्वचेवरुन फिरवताना जशी केसांच्या वाढीची दिशा असेल, तसेच फिरवावे. असे न केल्यास केसांच्या वाढीची दिशा बदलू लागते, त्यामुळे वॅक्सिंग करताना रक्त येणे, तर कधी पुरळ उठणे अशा समस्या उद्भवू शकतात.
  6. काही रेझर्स ‘युज ऍण्ड थ्रो’ प्रकारातील असतात. अर्थात नियम पाळावा व त्याप्रमाणे ती एकदा वापरल्यावर पुन:पुन्हा वापरु नयेत.
  7. शेविंगची प्रक्रिया संपल्यानंतर हात पाय धुवून नीट कोरडे करावेत व आता त्यावर मॉच्छराईज क्रिमने हलकासा मसाज करावा.

इतकी काळजी आवर्जून घ्यायलाच हवी आणि त्यापलिकडे वॅक्सिंगला पर्याय म्हणून वरचेवर रेझर निवडणे चुकीचे आहे, हे देखील पक्के ध्यानात ठेवायला हवे.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares