kid banner

लहानग्यांच्या सुरक्षेसाठी इतके कराच!

सध्याच्या काळात मुलं इतकी smart झाली आहेत की बऱ्याच गोष्टींमध्ये पालकांपेक्षा जास्त माहिती मुलांनाच असते किंबहुना पालकच काही गोष्टी मुलांकडून जाणून घेतात. याचा अनुभव आपल्याला येतच असतो. पण मुलं smart असण्यासोबत aware असायला पाहिजेत यासाठी आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाय आपल्याला करता येऊ शकतात

1 शाळा, class, खेळ आणि वेगवेगळे उपक्रम या सगळ्याच ठिकाणी मुलं एकटं वावरतात त्यावेळी त्यांच्या खिशात गरजेपुरते पैसे जरूर द्या. पैसे देते वेळी त्याचं महत्त्व आणि अडीअडचणीसाठीच्या वेळी लागणारी उपयोग्यता मुलांना पटवून द्या.

2 घरच्यांचे संपर्क मुलांना घरच्यांचे mobile no. तोंडपाठ असायला हवेत. आईवडिलांच्या office चा नंबर देखील त्यांच्याकडे असायला हवा.तसेच जवळपास राहणाऱ्या नातेवाईक आणि विश्वासू लोकांची घरे माहीत करून द्या.

3 मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजकल बाजरात tracker देखील मिळते. त्याच्या सहाय्याने मुलांचे location आपल्याला कळू शकते.

4 रस्त्यात अनोळखी व्यक्तींशी जास्त बोलू नये याबाबत त्यांना सूचना द्या.

5 घरी एकटे असताना दरवाज्या उघडण्याआधी safety door आणि peephole मधून आधी खात्री करायला हवी हे देखील सांगून ठेवणे आवश्यक आहे.

काही गोष्टी अगदी छोट्या। छोट्या असतात किंवा त्या आपल्याला प्राथमिक वाटू शकतात;पण त्यांचं महत्त्व खुप जास्त असते. त्यामुळे अशा गोष्टींच्या बाबतीत आपण आधीच सावधगिरी बाळगणे कधीही चांगलेच!

More Articles
Designed and Developed by SocioSquares