saree banner

आता साडी नेसायची नाही, ‘घालायची’!

स्त्रियांचं खरं सौंदर्य खुलुन दिसतं ते साडीमध्ये असं म्हटलं जातं. सिल्क साडी, कांजीवरम, पैठणी अशी एक ना अनेक साड्यांचे प्रकार आपल्याला अगदी तोंडपाठ असतात आणि दुकानात गेल्यावर कोणती साडी घ्यायची यावर तर मनात युद्ध सुरु होतं नाही का? पण साडीच्या बाबतीत सगळ्यांच्या कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे साडी सावरायची कशी? साडीमध्ये वावरताना बऱ्याच जणींना तारेवरची कसरत करावी लागते. आपल्या याच गोष्टींकडे लक्ष देऊन आजकाल बाजारात हटके लुक देणाऱ्या साड्यांची चलती आहे. लग्नसमारंभ, कॉलेजमधल्या वेगवेगळ्या इव्हेंटसाठी, सणासुदीला या साड्या खरोखर उत्तम पर्याय ठरू शकतात.

१. रीजॉट साडी
बाहेर फिरायला जाण्यासाठी ही साडी अगदी comfortable आहे. मॉडर्न लुक देणारी ही साडी सतत सावरायची देखील गरज नसते. या साडीला zip असते तसेच हुक किंवा गाठ बांधायचा पर्याय असतो. त्यामुळे फिरताना साडीचं टेन्शन राहत नाही.

२. पलाजो साडी
Fashion जगतात पलाजोचा नवीन ट्रेण्ड आला आहे. ज्याप्रमाणे पलाजो घालायला सुटसुटीत असतात त्याचप्रमाणे साडी देखील वापरायला सुटसुटीत असते. पलाजोला हटके पद्धतीने स्टिच करून साडीला फॅशनेबल लुक देण्यात आला आहे.

३. स्कर्ट साडी
स्कर्ट साडीमध्ये पुढे ७ ते ८ प्लेट्स काढून त्यांना खोचा आणि पदर आपल्या आवडीप्रमाणे पुढे आणा किंवा खांद्यावरुन मागे टाका. दोन्ही पद्धतीमध्ये स्कर्ट साडी एक नवा लुक देते.

४. बेल्ट साडी
पूर्वी साडीवर ‘कंबरपट्टा’ घातला जायचा . आता त्यालाच स्टायलिस्ट लुक देण्यासाठी बेल्ट बनवला आहे. या बेल्ट साडीमध्ये सतत पदर सावरायची गरज पडत नाही.

५. जॅकेट साडी
ही साडी पारंपरीक पद्धतीनेच नेसली जाते पण त्यावर सुट होईल असं नक्षीदार जॅकेट देखील घातलं जातं जेणेकरून पारंपारिक साडीला नवा साज मिळतो.

६. गाउनसाडी
गाउनमध्ये ज्याप्रकारे Comfortable राहता येतं तसंच लुक साडीला सुद्धा दिला आहे. पदर आणि प्लेट्स देऊन साडीचा Feel येतो आणि दिसायला देखील आकर्षक दिसतो.

७. पँट चूड़ीदार साडी
चूड़ीदार तर स्त्रीवर्गात अतिशय आवडीचा असा पेहराव आहे. त्याच पद्धतीने त्याला साडीचा लुक देखील देण्यात आला आहे. चालताना ही साडी पायांमध्ये अडकतही नाही.

अशा काही साड्या विकत घेता येतात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिवून देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्या ठेवणीतल्या साड्यांना देखील अशाप्रकारे मॉर्डन लुक तुम्ही देऊ शकता.

या अत्याधुनिक साड्यांच्या प्रकारातून आपल्याला tradition आणि fashion यांचा मेळ घालता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares