CANCER

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे, वाचा इथे…

नव्या जीवनशैलीने माणसाचं आयुष्य आंतर्बाह्य बदललं. आता, अर्थार्जनासाठीचं कामाचं स्वरुप शारीरिक कष्टापेक्षा मानसिक ताणात भर घालणारं ठरतंय. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर साध्या सोप्प्या कामांमध्येही यांत्रिकता आली. रुचकर घरगुती जेवणापेक्षा ऑर्डर देताच सर्व्ह होणा-या देशोदेशीच्या चवी अधिक आपल्याशा वाटू लागल्या. पिढीगणिक या बदलांचा प्रभाव वाढतोय आणि विस्खळीत झालेल्या जगण्याचे दुष्परिणाम थेट आरोग्यावर होत आहेत.

मानव जात आजारपणाच्या विळख्यात अडकत चालली आहे. सतत नवनवे रोग, व्याधी डोकं वर काढतायत, त्यांच्यावरील औषधोपचारांची संशोधनप्रकिया देखील सुरु आहे. शक्तिशाली आजारांपुढे कधीकधी विज्ञानही हतबल होतं.  मुख्यत्वे, कर्करोगासारख्या महाभयंकर राक्षसाने प्रचंड उच्छाद मांडलेला असताना स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. या रोगापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी निरोगी जीवनशैली आत्मसात करायला हवी, तसेच या रोगाच्या लक्षणांविषयी माहित हवे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे –

  1. स्तनामध्ये कठीणपणा येणे, गाठ किंवा गोळा येणे.
  2. स्तन सूजणे.
  3. स्तनात वेदना होणे.
  4. स्तनाला सतत खाज येणे.
  5. स्तनाचा आकारात लक्षणीय बदल होऊन, ते वाढते किंवा आकुंचन पावते.
  6. स्तनाग्रातून स्त्राव वाहणे.
  7. स्तनाग्राभोवती पांढरेपणा वा तांबूसपणा येऊन वेदना होणे
  8. पाठ दुखी किंवा स्नायूंच्या वेदना

स्तनाच्या कर्करोगाच्या या लक्षणांची माहिती असणे अत्यावश्यक आहेच, तसेच वरचेवर शरीराची पूर्णत: तपासणी होणेही गरजेचे आहे. शरीराचा फॅशनेबल दर्जा वाढवण्याच्या नादान, ढासळणा-या निरोगी आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष आपण लक्षात घ्यायला हवं. बेशिस्त वागण्याचा आता आणखी अतिरेक न होऊ देता वेळीच सावरुया, जमतील तसे व शक्य होतील तेवढे निरोगी बदल जीवनशैलीत करुया.

More Articles
Designed and Developed by SocioSquares