dryer (2)

हेअर ड्रायर वापरता, मग आधी हे वाचा!

सकाळच्या धावपळीत केस धुण्याचा घाट घातला, की ते लवकर सुकवून ऑफीससाठी निघावे लागते. कारण, केस दमट राहिले तर डोके दुखणे, सर्दी होणे अशा समस्या सतावतात. यावर उपाय म्हणून घरोघरी वापरले जाते हेअर ड्रायर!

मुख्यत: पार्लरमध्ये हेअर ड्रायर वापरले जायचे, आता पर्सनल मेकअप किटमध्येच त्याचा समावेश झाला आहे. पण या ड्रायरचा वापर करताना थोडी काळजी घ्यायला हवी.

केसांचा पोत जर ड्राय असेल, तर ओले केस ड्रायरच्या गरम हवेने अधिक राठ होतात. डोक्याची त्वचा कोरडी होऊन कोंडा होतो. केस खराब होतात. लांब केस असल्यास त्यांची निगा राखणे आधीच जोखमीचे काम असते. ते ड्रायरने अधिक कोरडे होऊन, गुंतण्याचे प्रमाण वाढते. केसांचा पोत सिल्की असला, तरी वरचेवर ड्रायरने केस सुकवणे शक्यतो टाळावे.

ब्लो ड्रायर, हॉट आयर्न, किंवा स्ट्रेटनिंग मशीन नियमित वापरल्याने हळुहळू केसांचे आरोग्य कमी होऊन, केस गळणे, तुटणे, केसांच्या टोकांना चिर जाणे असे प्रकार घडतात. म्हणूनच, हेअर ड्रायर क्वचित वापरणे ठिक, पण या ड्रायरचा नियमित वापरल्यास केसांचे आरोग्य बिघडते.

या सा-यावर उपाय म्हणजे सुतीकपड्याने केस पुसून घ्यावेत किंवा नैसर्गिकरित्या केस सुकवावेत.

More Articles
Designed and Developed by SocioSquares