eggless banner

रेसिपी – बिनअंड्याचा केक

साहित्य –

एक कण्डेन्स्ड मिल्क टिन, लिम्का लहान बाटली (पाऊण भाग), २८० ग्रॅ. मैदा, १२० ग्रॅ. मार्गारिन, ३ टि.स्पू. दूध, १ टि.स्पू. बेकिंग पावडर, १/४ टि.स्पू. खायचा सोडा

पाककृती –

  1. मैद्यात बेकिंग पावडर व खायचा सोडा मिसळून घ्यावा.
  2. केकच्या भांड्यास आतील बाजूने मार्गारिन व मैदा लावून घ्यावा.
  3. ओव्हन १० मिनिटं प्री-हिट करावा. मार्गारिन वितळवून त्यामध्ये कण्डेन्स्ड मिल्क नीट मिसळून घ्यावे.
  4. आता, मार्गारिन व कण्डेन्स्ड मिल्कच्या मिश्रणात थोडा थोडा मैदा घालून, मिश्रण ढवळत रहावे. मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यामध्ये लिम्का घालून पुन्हा नीट ढवळून घ्यावे.(मिश्रण जाडसर राहील याची काळजी घ्यावी.)
  5. नंतर, तयार मिश्रणास केकटिनमध्ये पसरवून गरम ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर ३० ते ३५ मिनिटे बेक करण्यास ठेवावे.
  6. केक टिनच्या कडा सोडेपर्यंत नीट बेक करुन घ्यावा.
  7. या केकमध्ये सुक्या मेव्याचे तुकडे मैद्यात घोळवून घालता येतील.
Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares