Lemon (2)

रेसिपी – लेमन पुडींग

साहित्य –

दोन मोठे चमचे पांढरे लोणी, पाऊण वाटी साखर, एक लिंबू, एक कप दूध, दोन अंडी, दोन मोठे चमचे मैदा, चवीपुरता मीठ

पाककृती –

  1. अंड्यातील पिवळा बलक व पांढरा भाग वेगवेगळा फेटून घ्यावा.
  2. लोण्यात सार मिसळून मिक्सरमध्ये नीट फेटून घ्यावी. मैद्यात मीठ घालून चाळून घ्यावा.
  3. त्यानंतर, लिंबाची साल कापून किसून घ्यावी व लिंबाचा रस वेगळा काढून घ्यावा.
  4. आता, चाळून घेतलेला मैदा लोणी व साखरेत मिसळून त्यात लिंबाच्या सालीचा कीस, लिंबाचा रस, फेटून घेतलेला अंड्यातील पिवळा भाग व दूध देखील मिसळावे, संपूर्ण मिश्रण नीट घोटून घ्यावे.
  5. नंतर, फेटून घेतलेला अंड्यातील पांढरा भाग हळूहळू तयार मिश्रणात घालून पुन्हा ते एकजीव होईपर्यंत घोटून घ्यावे.
  6. ओव्हनप्रूफ भांडे आतल्या बाजूने ओले करुन त्यात हे मिश्रण नीट पसरवून घ्यावे.
  7. दुसरे ओव्हनप्रूफ उथळ भांडे घेऊन त्यामध्ये मिश्रणाचे भांडे ठेवावे व १८० डिग्रीला ३० ते ४० मिनिटे भाजून घ्यावे.

अशाप्रकारे, लज्जतदार पुडींग तयार होईल जे जेवणानंतर डेझर्ट स्पेशल म्हणून सर्व्ह करता येईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, वाट पाहातोय तुमच्या प्रतिक्रियांची!!

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares