mango cheese cake BANNER

मॅंगो चीझ केक!

साहित्य-
२०० ग्रॅ. क्रिम चीझ, १५० मिली क्रिम, २५० ग्रॅम मॅंगो पल्प(ताजा आमरस), १/२ वाटी मारी बिस्किटांचा चुरा, २ टि.स्पू. बटर, १/२ वाटी साखर(रसाच्या गोडीप्रमाणे प्रमाण कमी-जास्त करावे), १ टि.स्पू. जिलेटीन पावडर, दीड टि.स्पू. वेलचीपूड

पाककृती-

१. प्रथम बिस्किटांचा चुरा करुन घ्यावा. वितळलेले बटर त्यामध्ये घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावे.

२. केकच्या साच्यात वरील मिश्रण म्हणजेच केकचा बेस सेट करुन घ्यावा.

३. केकचा साचा नसल्यास, बाऊलमध्येही बेस सेट केलात तरी चालेल. तयार टीन किंवा बाऊल फ्रिजमध्ये १५ ते २० मिनिटे थंड होण्यास ठेवावे.

४. आता, एका बाऊलमध्ये क्रिम चीझ, फ्रेश क्रिम व साखर घालून मिश्रण बीटरने फेटून घ्यावे.

५. साधारण अर्धा मिनिट गरम केलेल्या पाण्यामध्ये १ टि.स्पू. जिलेटीन पावडर घालावी व नीट वितळू द्यावी. हे मिश्रण आब्यांच्या रसातमध्ये घालावे व आंब्याचा रस ढवळून घ्यावा.

६. बीटरने फेटलेल्या मिश्रणात जिलेटीन मिश्रित आंब्याचा रस घालावा. त्यामध्ये वेलचीपूड मिसळून पुन्हा बीटरने फेटून घ्यावे.

७. फ्रीजमध्ये ठेवलेल्या टीनवर वरील मिश्रणाचा जाडसर थर पसरावा व २० मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवावे.

८. २० मिनिटांनी उरलेल्या आंब्याच्या रसाचा थर द्यावा व आता तयार केक साधारण ७ ते ८ तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावा.

९. आवडत असल्यास, चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट चिप्सने चीझ केक गार्निश करुन सर्व्ह करावा.

वरील, मॅंगो चीझ केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खालील कमेन्टबॉक्सद्वारे!

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares