modak banner (1)

रेसिपी पंचरत्न मोदक

साहित्य – दोन वाफवलेले बटाटे, ५० ग्रॅ. शिंगाड्याचे पीठ, १०० ग्रॅ. खवा, १/२ वाटी साबुदाणा, भगरचे पीठ, २५० ग्रॅ. पिठी साखर, १/२ वाटी खोब-याचा कीस, सुकामेवा, इलायची पूड व तूप

पाककृती –
१. प्रथम खवा चांगला भाजून घ्यावा. वाफवून घेतलेल्या बटाट्याच्या किस स्मॅश करावा.
२. हा किस चमचाभर तूपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यावा.
३. आता, शिंगाडा, साबुदाणी व भगरचे पीठ साधारण तांबूस रंगाचे होईस्तोवर तूपामध्ये भाजून घ्यावे.
४. बटट्याचा किस व खवा यांना एकत्र करुन पुन्हा एकदा भाजून थंड होण्यासाठी ठेवावे.
५. आता त्यामध्ये पिठीसाखर, इलायची पूड व सुकामेवा मिक्स करावा.
६. मोदक साच्याचा वापर करुन या मिश्रणाचे छान मोदक तयार करावेत.
७. अशाप्रकारे, तयार झालेले चविष्ट मोदक तुम्ही केव्हाही सर्व्ह करु शकता.
तुम्हाला, मोदकाची ही रेसिपी कशी वाटली नक्की लिहा खालील कमेन्ट्समध्ये.. तुमच्याजवळ अशा काही हटके रेसिपीज् असतील तर त्याही शेअर करा ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये..

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares