पातोळ्या (1)

रेसिपी – पातोळ्या

साहित्य: १ वाटी तांदळाचे पीठ, १ कप किसलेला नारळ, अर्धा कप गूळ, चिमूटभर वेलचीपूड, २ चमचे साजूक तूप, हळदीची ताजी पाने, चवीनुसार मीठ

पाककृती: ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलचीपूड एकत्र एका पॅनमध्ये शिजवून, मोदकासाठी करतो तसे सारण तयार करुन घ्यावे.

आता, पातोळ्यांच्या आवरणासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून, हळुहळू त्यात पाणी मिसळत त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट फार जाडसर किंवा फार पातळही नसावी.

त्यानंतर, हळदीच्या पानाला आतील बाजूने थोडे तूप लावावे. त्यावर तांदळाची पेस्ट पसरवावी. त्या पेस्टवर तयार केलेले सारण पसरल्यावर पान दुमडून घ्यावे.

अशाप्रकारे, तयार केलेल्या हळदीच्या पानांना मोदकाप्रमाणे उकडून घ्यावे.

गरम गरम पातोळ्या हळदीच्या पानांसहित सर्व्ह कराव्यात, खाताना मात्र हळदीचे पान काढून आतील पातोळ्यांचा आस्वाद घ्यावा.

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares