scarf (8)

थंडीच्या स्कार्फची स्टाईलिश बांधणी!

वर्षभर स्कार्फ वापरण्याची स्टाईल रुढ झाल्याने प्रत्येकीच्या संग्रही भरपूर रंगीबेरंगी स्टाईलीश स्कार्फ असतातच. आरोग्यहितार्थ कान, डोके झाकण्यासाठी आणि इतरवेळी गळ्याभोवती स्कार्फचा देखणा फेरा ठेवून स्वत:चा लूक अधिक बहारदार करण्यासाठी स्कार्फ उपयुक्त ठरतो. हा स्कार्फ बांधण्याच्या काही हटक्या पद्धती आज शिकणार आहोत.

फ्रेंच क्नॉट
अगदी झटपट फ्रेंच क्नॉट बांधता येते. एकाच रंगातील किंवा रंगीतसंगीत स्कार्फ असली तरी ही स्टाईल सुरेख दिसते. स्कार्फ लांबीने मोठा असल्यास फ्रेंच क्नॉट पद्धतीने त्याला असे छोटे रुप देता येईल.

scarf (4)

हॅगिंग स्टाईल

हा प्रकार फॅशन म्हणून उठून दिसतोच, पण कधी टॉपच्या गळ्याचा आकार मोठा आणि तो कव्हर करायचा असले; तरी हॅगिंग स्टाईल स्कार्फ बांधणं योग्य ठरतं.

scarf (5)

हिडन क्नॉट

या नावातचं या स्टाईलची गंमत दडलीय. स्कार्फ बांधताना घेतलेली गाठ इथे लपवली जाते. त्यामुळे इतरांपेक्षा ही स्टाईल निराळी व देखणी ठरते.

scarf (6)

बोहो टाय

दोन स्कार्फच्या एकत्रित वापरातून बोहो टाय बांधली जाते. टॉपच्या रंगाला साजेसे दोन जितके विविध रंगांचे स्कार्फ निवडाल तितकी ही स्टाईल सुरेख दिसेल.

scarf (3)

नेक बो स्टाईल

फॉमर्ल्सवर हमखास शोभून दिसणारी नेक बो स्टाईल बांधायला अगदी सोप्पी आहे.ऑफिसला निघण्याच्या घाईगडबडीतही सहज बांधून होईल.

scarf (7)

साईड क्नॉट

कुठल्याही टी-शर्ट, टॉपवर शोभून दिसणारी साईड क्नॉट ट्राय करा कधीही, मग ऋतू असो कुठलाही!

scarf (2)

यंदाची थंडी स्टाईलीश असावी, असं वाटत असेल; तर तुम्ही वापरत असलेला स्कार्फ तुमचा लूक अधिराधिक खुलवेल याची काळजी घ्या. वरील स्टाईल आलटूनपालटून वापरा, त्या त्यांचे काम अचूक करतील. पाहाच आजमावून!

Image Source- Pinterest

More Articles
Designed and Developed by SocioSquares