Winners

प्रिती पाटकर

१९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे. मानवी तस्करी तसेच लैगिंक शोषणाच्या व्यापाराला बळी पडणा-या लहान मुलांना व स्त्रियांना एक सुरक्षित जीवन देण्याचे तसेच, त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य ‘प्रेरणा’ या त्यांनी उभारलेल्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने करीत आहेत. रेड लाईट एरियातील लहानग्यांसाठी शिक्षणाच्या सोयी, एड्स बाधित लहान मुलांसाठीचे कार्यक्रम तसेच तेथील स्त्रियांसाठी विकासपर उपक्रम ‘प्रेरणा’ राबवते आहे.

भारत सरकारने १९९८ साली मानवी तस्करी विरोधातील अग्रेसर अशी पहिली राष्ट्रस्तरीय योजना म्हणून ‘प्रेरणा’च्या कार्याला गौरवले. परदेशात देखील त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. २००० साली यंग अचिव्हर ऑफ इंडो-अमेरिका सोसायटी पुरस्कार, २००३ साली कल्पना चावला पुरस्कार, २००३ साली रोटरी ल्कब ऑफ बॉम्बे आऊटस्टॅंडींग वुमेन ऑफ दी इयर पुरस्कार, २००५ साली लायन्स क्लब इंटरनॅशनल एक्सलन्स पुरस्कार, जागतिक महिलादिना निमित्त २००७ साली टाईम्स संस्थेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्यास राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले आहे.

राष्ट्रीय महिला योजना, महाराष्ट्र राज्य महिला योजना अशा विविध समितींचा कार्यभार देखील त्यांनी सांभाळला आहे. बाल संरक्षासाठीच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल २००९ सालचा स्टार फाऊंडेशन(युके) पुरस्कार ‘प्रेरणा’ संस्थेस बहाल करण्यात आला. प्रिती यांना २०१० साली शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ७ पुस्तकांचे लेखन तसेच अनेक संशोधन पत्रिकांचे लिखाण त्यांनी केले आहे. इतक्या मोठ्या प्रवासानंतर ‘प्रेरणा’चे कुटुंब आता जगभरातील अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेले आहे. राष्ट्राचा विकास प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीशी निगडीत आहे. समाजातील आर्थिक स्तर, श्रीमंत – गरीब दरी यांमुळे खचलेल्या व परतीचा मार्ग ठाऊक नसल्यामुळे परिस्थितीला शरण जाणा-या व्यक्तिंचे भविष्य उज्ज्वल करणा-या ‘प्रिती पाटकर’ यांचे कार्य त्यांच्या संस्थेच्या नावाप्रमाणेच प्रेरणादायी आहे.

उंच माझा झोका पुरस्कार 2016
 • Naseema Hurzuk

  Chairman, Helpers of Handicap Society

   

  अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

 • Usha Madavi

  Desert Saver

   

  गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

 • Taramati Matiwade

  International Yatching player

   

  पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

 • Swati Sathe

  Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

   

  कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

 • Harshada Devdhar

  Organization- Bhagirath Gramvikas Pratishthan

   

  समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती.

 • Dr. Smita Lele

  Science and Technology

   

  स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

 • Kavita Jadhav

  Bidve

   

  शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquares